बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्याकडून पैसे घेते आणि दुसऱ्यांशी बोलते’; संतापलेल्या प्रियकराने केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

पुणे | पुण्यातील लोहगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरानं गळा दाबून प्रेयसीचा खून केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पुण्यातील लोहगाव याठिकाणी एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत आरोपी युवकाला जेरबंद केलं आहे.

आरोपी युवकाचं नाव संतोष महादेव राठोड असून त्याचे संबंधित मृत महिलेशी प्रेमसंबंध होते. लोहगाव परिसरात राहणारा आरोपी सोमवारी रात्री आपल्या प्रेयसीकडे जेवणासाठी गेला होता. यावेळी  त्याने संधी साधून प्रेयसीचा गळा दाबून तिचा खून केला आहे. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडही घातला.

आरोपीनं संबंधित महिलेला अनेकदा पैशांची आणि इतर मदत केली होती. पण आपल्याकडून पैसे आणि इतर मदत घेऊन ती दुसऱ्या लोकांसोबतही बोलते. याचा राग मनात धरून आरोपीनं महिलेचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला प्रियकराला अटक केली असून पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘बाळांनो, आम्ही लगेच येतो’ सांगून कोरोना उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला कोरोनाने गाठलं

कडक सॅल्यूट! पत्नीचे दागिने विकून पठ्ठ्याने रिक्षाला बनवलं रुग्णवाहिका

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

कोरोनाने आई, वडिल आणि भावाचा मृत्यू; घरी न जाता रुग्णांची सेवा करत राहिली महिला डॉक्टर

“मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार नाही हे दुर्दैव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More