अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजपासून पाथर्डीतून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी मुश्रीफांना शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाला सामोरं जावं लागलं.
शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांची गाडी रस्त्यात अडवून सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांच्यासमोर धरली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करत होते.
जनतेला कशी मदत मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांची नाळ आमच्या सोबत जोडली गेली आहे. पंचनामे केल्याशिवाय ही मदत देता येत नाही. पंचनामे केल्याशिवाय सरकारला किती मदत द्यायची ? याचं आकलन होत नाही, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.
आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. तसेच राज्यातील विरोधक सत्तेत होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना कधी सरसकट मदत केली का?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण…- रामदास आठवले
“भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का?”
अजित पवारांना कोरोना झालेला नाही, पार्थ पवारांनी केलं स्पष्ट
“महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाकारणं म्हणजे कायद्यालाच आव्हान देण्यासारखं आहे”