चिडलेल्या न्यूज अॅंकरनं अभिनेत्याला काढलं स्टूडिओतून बाहेर, पाहा ‘तो’ व्हिडीओ
नवी दिल्ली | सोशल मीडियावर (Social Media) रोज काही ना काही व्हायरल होत असलेलं पहायला मिळत असतं. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ एका वृत्तवाहिनीवरील असून भर कार्यक्रमात न्यूज अॅंकरनं तेलगू अभिनेत्याला बाहेर काढल्याचं पहायला मिळालं. लोकप्रिय तेलुगू अभिनेता विश्व सेन सोमवारी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वृत्तवाहिनीसोबत मुलाखत देण्यासाठी आला होता.
विश्व सेनचा अॅंकरने पागल सेन असा उल्लेख केला यावरुन विश्व सेन भडकल्याचं पहायला मिळालं. त्यानं माझ्या वैयक्तिक आयु्ष्यावर तुला बोलण्याचा काही एक अधिकार नसल्याचं अभिनेत्यानं म्हटलं. यानंतर अॅंकरचाही पारा चढला. टीव्ही अॅंकर देवी नागवल्ली त्याच्यावर ओरडते आणि त्याला स्टुडिओतून बाहेर पडण्यास सांगते.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असलेल्या पहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ –
I never saw a woman looking so much more powerful than a man 💪😍💪 @Devi_Nagavalli is no less than SARKAR 🙏🙏🙏 pic.twitter.com/QbJIMTbR0K
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 2, 2022
थोडक्यात बातम्या –
अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात घसरण, वाचा ताजे दर
पबमध्ये मैत्रिणीसोबत दिसले राहुल गांधी, भाजप नेत्याकडून व्हिडीओ शेअर
“घरात बसून बोलायला काय जातं, गुन्हे तर कार्यकर्त्यांवर दाखल होतील”
“बाबरीवेळी मोदी, शहा कुठे लपून बसले होते, फडणवीस तर पळताना दिसत होते”
“लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेला होता”
Comments are closed.