बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंदिरं उघडताना तिसरी लाट आडवी येते, मग दारूची दुकानं कोरोनाप्रूफ आहेत का?”

मुंबई | महाराष्ट्रासह पुर्ण देशभरात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व सण आणि उत्सवांवर सरकारने निर्बँध लावले आहेत. मागील वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने मनाई केली होती. त्यानंतर आता यावर्षी देखील दहीहंदी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

दारुचे ठेके आणि बार उघडताना कोरोनाची तिसरी लाट आडवी येत नाही. त्याचबरोबर मॉल उघडताना, बाकीच्या गोष्टी उघडताना बंद करताना तिसरी लाट आडवी येत नाही. मात्र, हिंदुंची मंदिरं उघडताना तिसरी लाट आडवी कशी येते? मग दारुची दुकानं कोरोनाप्रुफ आहेत की वेगळं चिलखत घालून बसली आहेत?, असा संतप्त सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोविंदा पथकाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.मागील वर्षी गोविंदा पक्षकानं दहीहंडी उत्सव साजरा केला नव्हता. यावर्षी छोट्या प्रमाणात का होईना दहीहंडी साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रतिनिधींनी बैठकीत केली होती. त्यानंतर संपुर्ण राज्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपसोबत मनसेनेही दहीहंडी उत्सव साजरा करणार असं सांगितलं होतं. ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर मनसेनेही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्यानं कोरोना संसर्ग वाढू शकतो, असं टास्क फोर्सने सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी केंद्राची हालचाल??; उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

बांद्राच्या कॅफेत सनी लिओनीची ‘खास’ झलक, पाहा व्हिडीओ!

दुबईमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून ‘हे’ खेळाडू बाहेर, पाहा व्हिडीओ

लोकहो सावध राहा! तिसऱ्या लाटेबाबत नीती आयोगाचा अत्यंत गंभीर इशारा, पाहा व्हिडीओ

“अफगाणिस्तानमध्ये महिलांना पुन्हा मुलं जन्माला घालण्याचं मशीन बनवलं जाणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More