बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटात गेल्याने धैर्यशील मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

कोल्हापूर | शिवसेनेची (Shivsena) गळती अजूनही चालूच आहे. आमदारांच्या बंडखोरीने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. मात्र, जेव्हा 18 पैकी 12 खासदार शिंदे गटाला जाऊन मिळाले तेव्हा शिवसेनेला पडलेलं भगदाड अधिकच मोठं झालं. या 12 खासदारांमध्ये हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचाही समावेश आहे.

शिंदे गटात सामील झाल्याने हातकणंगले मधील शिवसैनिक मानेंविरोधात आक्रमक झाले आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर त्यांच्या विरोधात मोर्चा पुकारला जाणार आहे. धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. दरम्यान या घटनेवर खासदार धैर्यशील माने यांनी एक परिपत्रक (Circular) काढत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी भावनाविवश (emotional) झाल्यामुळे नेमकं हे का घडलं? कशामुळे घडलं ?यासाठी त्यांचा आक्रोश, त्यांच्या भावना मी समजू शकतो. याच्या उत्तरासाठी उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कोणत्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. विरोधात सहभागी होणारे सगळे आपलेच आहेत. त्यांचा माझ्यावर पुर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे, असं त्यांनी परिपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, अधिवेशनासाठी मी सध्या दिल्लीत (Delhi) आहे. मी तिकडे आल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन. तोवर संयम राखून मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. मोर्चाला कोणताही प्रतिकार होत कामा नये, या दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी या पत्रकातून केले आहे.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का, निष्ठावंत आमदार शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक

‘मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती’, दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा!

‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More