मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबातील भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

सांगली | लहान मुलं खेळायला लागली की किरकोळ वाद हा होतोच. मोठ्यांनी हा वाद शांतपणे सोडवून लहान मुलांना समजावलं पाहिजे. मात्र हा वाद एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनल्याची घटना सांगली येथे घडली आहे. सांगली येथील गवळीगल्ली परिसरात राहणाऱ्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरून भांडण झाली. त्यानंतर जे झालं ते अतिशय विचित्र होतं.

1 मे रोजी सायकांळी पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी रहिवासी असणारे समीर यांचा लहान मुलगा रिहान हा खेळण्यासाठी बागवान हॉलच्या मागील मोकळ्या जागेत गेला होता. त्यावेळी समीर यांचे शेजारी असलेले आयुब सय्यद याचा मुलगा अरिष उर्फ मुस्तकीम आयुब सय्यद देखील तेथे किक्रेट खेळण्यासाठी आला होता. समीर यांचा मुलगा व शेजारी मुलगा रिहान डिग्रजकर असे हात पाय धुन्यासाठी तेथील नळाजवळ गेले होते.

नळाच्या इथे दोघांचा वाद झाला. हा वाद घरापर्यंत पोहोचला आणि दोन कुटुंबियांमध्ये तुफान मारहाण झाली. यादरम्यान समीर यांच्या भावाला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, घडलेल्या या घटनेनंतर सिव्हिल हाॅस्पिटल समोर दोन गट समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत वाद घालणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणात समीर बाबासाहेब अत्तार यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आयुब सय्यद हसन सय्यद यांच्यासह अनोळखी पाच ते सात जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

धक्कादायक! पतीचा मृतदेह दिल्लीतील हाॅटेलमध्ये पडुन; पत्नी मात्र एकटीच परतली मायदेशी

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

arguementCricketDeathFightheart attackquarrelSanglitwo kidsक्रिकेटदोन मुलेभांडणभांडणेमृत्यूयुक्तिवादसांगलीहृदयविकाराचा झटका