बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ एका व्यक्तीनं तयार केली मॅच विनर्सची फौज; बदलली आहे टीम इंडिया

मुंबई | मायदेशासह विदेशातही भारतीय संघ विजय मिळवत आहे. भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून पूर्ण बदलली आहे. हा बदल इतका सहजासहजी झालेला नाही. यासाठी देशांतर्गत क्रिकेटचं स्वरुप पूर्णपणं बदललं आहे. भारतामध्ये तरुण क्रिकेटपटूंची एक फौज तयार करण्यात आली आहे. त्यामुळेच आज 2 टीम इंडिया तयार झाल्या आहेत.

या सर्व बदलांचे श्रेय टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष राहुल द्रविड  यांचे आहे. द्रविडनेच गेल्या काही वर्षात पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुभमन गिल हे खेळाडू तयार केले आहेत. जे आज टीम इंडियाकडून खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेव्हिड वॉर्नर देखील द्रविडमुळे प्रभावित झाला आहे. ‘भारतीय क्रिकेटमधील बदलामध्ये राहुल द्रविडचं मोठं योगदान आहे. द्रविडनं मॅच विनर्सची फौज तयार केली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट बदलले आहे. हे समजून घेण्यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतानं मिळवलेला विजय हे सिद्ध करतो’, असं डेव्हिड वॉर्नरनं एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इशांत शर्मा गेला नव्हता. विराट कोहली आणि मोहम्मद शमी पहिल्या टेस्टनंतर बाहेर पडले. तरीही टीम इंडियानं मेलबर्न टेस्ट जिंकून बरोबरी साधली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रविंद्र जडेजा आणि उमेश यादव हे 2 टेस्ट सुद्धा खेळू शकले नाहीत. टीम इंडियाचे फक्त 2 खेळाडू संपूर्ण सीरिज खेळले. त्या सीरिजमध्ये 5 खेळाडूंनी पदार्पण केलं होतं.

दरम्यान, राहुल द्रविडनं नॅशनल क्रिकेट अकादमीतील बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्या मदतीनं अंडर-16, अंडर-19 खेळाडूंची फौज तयार केली आहे. या गटातील 150 सदस्यांची 6 वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघाला विभागीय स्तरावर वेगळं प्रशिक्षण दिलं जातं. यापैकी 50 खेळाडूंना वेगळं करण्यात आलं. त्यानंतर त्यांना नॅशनल कँपमध्ये प्रशिक्षण दिलं आहे. या ठिकाणी कोच, ट्रेनर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत. या सर्व प्रशिक्षणाचा आज भारतीय संघाला फायदा होत आहे.

थोडक्यात बातम्या –

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भाजपमधील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही- खासदार संभाजीराजे

पुढील तीन तास मुंबईसाठी धोक्याचे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेची विनंती विद्यापीठाने फेटाळली, तब्बल 9 हजार विद्यार्थी होणार नापास

प्रशांत किशोर यांची भाजप विरोधात मोहिम?; प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More