बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अंबानी आणि संघातील एका व्यक्तीने मला 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला”

नवी दिल्ली | जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक दावा केला आहे. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयाचे राज्यपाल आहेत. त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करत असताना तीनशे कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

अंबानी आणि संघातील एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या संदर्भात दोन फाईल्स मंजूर करण्याच्या बदल्यात हा मोबदला मिळणार होता असा मलिक यांचा दावा आहे. मात्र आपण कायद्यात न बसणारे कुठलेही काम करणार नाही म्हणत मी दिलेली ऑफर फेटाळून लावली आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांचे नाव घेऊन काही व्यक्ती असं काम करू पाहत होते. त्यानंतर मी पंतप्रधानांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर त्यांनी मला कायद्यानुसार काम करण्याचं सांगितलं असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मला त्यांनी कसलाही भ्रष्टाचार खपवून न घेण्याचं सांगितलं आहे. मलिक हे राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, त्यांनी केलेल्या दाव्यातील काम हे कोणत्या संदर्भातील होतं, या संदर्भातील खुलासा केला नसला तरी अनिल अंबानींच्या कंपनीचं असल्याचा काही माध्यमांनी असा नेम धरला आहे. सत्यपाल मलिक हे आपल्या स्पष्ट आणि बेधडक बोलण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

थोडक्यात बातम्या –

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

आयपीएलमध्ये पुन्हा बाॅलिवूडची एन्ट्री! रणवीर-दीपिका घेणार नवीन संघ विकत

भर कार्यक्रमात आढळला बंदूकधारी व्यक्ती; योगी आदित्यनाथ यांनी थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

“देशात कोणत्याही गोष्टीचा उत्सव साजरा करण्याचा नवीन पायंडा पडलाय”

‘माझ्या चेंडूमुळे सचिनची बरगडी मोडली, तरीही तो खेळत राहिला’; शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More