बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न; बच्चू कडूंवर गंभीर आरोप

अमरावती | सहकारी बँकेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. या निवडणुकीत सहकार पॅनल घवघवीत यश संपादन केले आहे. याचा जल्लोष सुरु असतानाच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी राज्यमंत्री बच्चू कडूंवर गंभीर आरोप करत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. तसेच जगताप यांनी केलेला आरोप आज खरा ठरल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.

7 ऑक्टोबरच्या सकाळच्या सुमारास चांदूर रेल्वे मतदार संघातील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे. या हल्ल्याबद्दल बोलताना वीरेंद्र जगताप यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले आहेत.

बच्चू कडू यांनी हा हल्ला जाणीवपूर्वक घडून आणला आहे, असा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. तसेच अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो अशी सूचना आम्ही पोलिसांना दिली होती, मात्र, पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नसल्याचं देखील जगताप म्हणालं आहे. त्यामुळे आता चांगलंच राजकारण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांनी ज्या तरुणांना ताब्यात घेतलं त्यातील दोन्ही प्रहारचे कार्यकर्ते होते. त्यांना बच्चू कडू यांचे सातत्याने फोन सुरू असल्याचं वीरेंद्र जगताप यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर डीसीआर तपासून पोलिसांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी माजी आमदार जगताप यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More