Top News देश

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

Photo Credit- Facebook/ Rahul Gandhi

पदुच्चेरी |  केंद्र सरकारने केलेल्या नविन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 80 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरी देखील सरकारने त्यावर कोणताच तोडगा काढलेला नाहीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला अनेक वेळा लक्ष्य केलं आहे. मात्र यावेळी राहुल गांधी आपल्याच वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत.

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राहुल गांधी प्रचार करण्यासाठी पदुच्चेरीत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा मुद्दा मांडला. त्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

राहुलजी हे मंत्रालय 31 मे 2019 मध्येच पंतप्रधान मोदींनी बनवलं आहे. तसंच 20,050 कोटी रुपयांची महायोजना सुुरु केली आहे. जी स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंतच्या केंद्र सरकारच्या खर्चाहून 3682 कोटीहून जास्त आहे, असं म्हणत राहुल गांधींना गिरीराज सिंह यांनी टोला लगावला आहे. या संदर्भात सिंह यांनी ट्विट केलं आहे. त्याचबरोबर राहुल गांधींचा व्हिडीओही शेअर केला आहे.

दरम्यान,  राहुलजी मी तुम्हाला नवीन मत्स्य व्यवसाय मंत्रालयात येण्याची विनंती करतो, किंवा आपण बोलवाल तिथं मी येतो. देशभरात आणि पदुच्चेरीत नवीन मत्स्य व्यवसाय मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांविषयी मी तुम्हाला माहिती देईन, असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या