बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद

मुंबई | संपुर्ण महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातील कोकणासह विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पुर आला आणि अनेक गावं पाण्याखाली गेली. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गावच्या गावं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रात महापुरामुळे मृत झालेल्या व नुकसान झालेल्या घटनेच्या पार्श्वंभुमीवर चिंताग्रस्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांतं लक्ष लागलं आहे. तसेच आता पाऊस आटोक्यात आला असला तरी पाणी अजूनही ओसरलेलं नाही. त्यातच शरद पवार चिंतातुर झाले असून तातडीच्या पत्रकार परिषदेला काही वेळातच सुरूवात होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 2 दिवसांपासुन कोकणच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी अहवाल आल्यानंतर तात्काळ स्वरूपात सर्वांना मदत दिली जाईल, असं आश्वासन देत अधिकाऱ्यांनाही लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या

अरे देवा! मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत कोरोनाही चिरडुन गेला, पाहा व्हिडीओ

सकारात्मक बातमी! सोमवारी देशात मागच्या 100 दिवसातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाच्या मदतीसाठी सरसावले एनडीआरएफचे जवान, पाहा व्हिडीओ

देशाच्या इतिहासात पहिलीच घटना; मतदारांना पैसे वाटल्यानं लोकप्रतिनिधी तुरूंगात

#TokyoOlympics | हाॅकी सामन्यात भारताचा 3-0 ने दणदणीत विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More