बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

औरंगाबाद | औरंगाबाद येथील बन्सीलाल नगरातील अजिंक्य फिलोसिया या अपार्टमेेंटमध्ये एक 70 वर्षाचं जोडपं राहतं होतं. मात्र या दोघांचाही 8 दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे. मृत्यूनंतर त्या दोघांचाही मृतदेह त्यांच्या राहत्या घरात 8 दिवस कुजत राहीला आणि त्यांच्या मृत्यूची 8 दिवस कोणालाही माहिती नव्हती.

संबंधित जोडप्याचं आडनाव म्हेंदळे असून पत्नीचं नाव माधुरी विजय म्हेंदळे तर पतीचं नाव विजय माधव म्हेंदळे असं होतं. हे दोघेही अजिंक्य फिलोसिया या अपार्टमेेंटमधील फ्लॅट नं 403 मध्ये राहत असून गेल्या 15 ते 16 दिवसांपासून यांना कोणीही घराबाहेर पाहीलं नव्हतं. तसंच काही दिवसांनंतर त्यांच्या घरातून अतिशय उग्र वास येऊ लागल्यामुळे प्रमोद नावाच्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली.

पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराला आतून कडी असल्याकारणाने पोलीस छतावर जाऊन गॅलरीत उतरले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढले. म्हेंदळे यांच्या मुलांची माहिती शोधल्यानंतर त्यांना एक मुलगी असल्याचं समोर आलं.

दरम्यान, दोन्ही मृतदेहांची तपासणी केल्यानंतर विजय म्हेंदळे यांना सोरायसीस आजार असल्याचं समोर आलं. तसेच माधुरी म्हेंदळे यांना पॅरालिसेस झाल्याचं देखील समोर आलं. म्हेंदळे यांची मुलगी अमेरिकेमध्ये राहत असून तिला येणं शक्य नसल्याचं तिने पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनीच त्या दोघांचा अंत्यविधी पार पडला.

थोडक्यात बातम्या-

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस; ‘या’ कारणाने पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

“लवंगी फटाका की, बाॅम्ब लवकरच स्पष्ट होईल”; देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More