बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर कायमच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात एखादी प्रसिद्ध व्यक्ती काही अफलातून करत असतानाचा व्हिडीओ असला तर तो चाहत्यांच्या जास्तच पसंतीस उतरतो. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एका क्रिकेटपटूचा.

टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करतोच त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावर प्रतिक्रिया देखील व्यक्त करतो. हरभजननं एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं छोले बनवण्याची पद्धत सांगितली आहे. त्याने स्वत: स्वयंपाकघरात छोले बनवले आहेत.

हरभजनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी हरभजनने तयार केलेले छोले खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हरभजननं त्याच्या करियरमध्ये 103 टेस्ट, 206 वन-डे आणि 28 आंतररष्ट्रीय टी 20 मॅच खेळल्या असून यामध्ये 700 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, हरभजन आयपीएल सिझन 14 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी तो केकेआरकडून 3 मॅच खेळला. यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. हरभजनने आयपीएल कारकिर्दीमध्ये 150 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स टीमचा सदस्य होता. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमधून हरभजनने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.

 

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या –

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र

खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे- उद्धव ठाकरे

डान्स इंडिया डान्स फेम ‘या’ कलाकाराचा गंभीर अपघात; देतोय मृत्यूशी झुंज

सरसकट 9 ते 6 दुकानं उघडायला परवानगी द्या अन्यथा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More