बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ‘या’ उमेदवारांना जोरदार धक्का

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु होत असल्याने चिंता वाढली आहे. तरीही निवडणूक आयोगाने ठरलेल्या वेळेनुसार निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिल्यास पक्षांना याबाबत माहिती द्यावी लागेल. त्याचबरोबर पक्षाच्या संकेतस्थळावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती आणि त्या उमेदवाराला का उमेदवारी देण्यात आली याबाबत माहिती द्यावी लागेल, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितलं आहे.

नियोजीत वेळेत निवडणूका होणं हा नागरिकांचा हक्क आहे. त्यानुसार आम्ही निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात काही नवीन नियम आणण्यात आले आहेत. सुरक्षित निवडणुका घेण्यावर आमचा भर आहे, असंही चंद्रा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावर्षी 7 राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारी- मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यात निवडणुका होणार आहेत. वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. परतुं निवडणूक आयोगाने वेळापत्रकानुसार निवडणुक आयोगाने घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुक्त झालेल्यांनो काळजी घ्या!; WHO ने दिली ‘ही’ चिंता वाढवणारी माहिती

केंद्र सरकारची मोठी योजना; लॉकडाऊनमध्येही उत्पन्न मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय

सलमानने बिचुकलेला फटकारलं, तर बिचुकले म्हणाला, ‘खड्ड्यात गेला तुझा शो आणि…’

“खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येतं, पण…”

राज्यात लॉकडाऊन लागणार? मॅरेथॉन बैठका सुरू, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More