बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरणाविषयी सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई | कोरोना (Corona) महासाथीच्या रोगानं गेल्या दोन वर्षात नागरिकांची चांगलीच तारंबळ उडवली आहे. अद्यापही कोरोनाचा शिरकाव थांबलेला नाही, रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोना काळात लसीकरण (Vaccination) हे एकमेव शस्त्र असलेलं पहायला मिळालं. अशातच आता सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) लसीकरणासाठी महत्त्वाचा निकाल दिला आहे. लसीकरणासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असा महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

अनुच्छेद 21 अंतर्गत शारीरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यात आलं आहे. कोणालाही लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. मात्र सरकार काही नियम लागू करु शकतं, अशा निकाल न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बी आर गवई यांच्या खंडपीठानं दिला आहे.

दरम्यान, करोना रुग्णसंख्या कमी आहे तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणांवर कोणत्याही व्यक्तीसाठी निर्बंध नकोत आणि जर असे निर्बंध लावण्यात आले असतील तर ते मागे घ्यावेत, असंही कोर्टानं सांगितलं आहे.

थो़डक्यात बातम्या – 

‘महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही’; अजित पवारांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अमृता फडणवीसांचा पलटवार, म्हणाल्या…

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘राज ठाकरे चौरंगी चिरा’, शरद पवारांवरील टीकेनंतर सुरेखा पुणेकर कडाडल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More