बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसला आहे. खाद्य तेलासारख्या जीवनाश्यक किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचा निर्णय घेतला आहे.

खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्याच्या आकारावर 31 मार्च 2022 पर्यंत अन्न आणि सार्वजनिक विभागाने मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट अन्नपदार्थबाबत परवाना देण्याबाबतची आवश्यकता, साठवणुक मर्यादा आणि संचलन निर्बंध हटवण्यासाठी 2021 साठी आदेश काढला आहे. हा आदेश 8 सप्टेंबर 2021 पासून जारी करण्यात आला आहे.

NCDEX मध्ये मोहरीचे तेल आणि तेलबियांसंबंधी वायदे बाजार 8 ऑक्टोबर 2021 पासून स्थगित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत खाद्यतेलांच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम देशातील ग्राहकांना होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोयाबीन तेलाची किंमत 1 वर्षापूर्वी 106 रूपये प्रतिकिलो होती ती आता 9 ऑक्टोबर रोजी 154.65 इतकी झाली आहे. एका वर्षात सोयाबीन तेलाच्या किमतीत 46.15 टक्के वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

काळ्या फिती लावू, परंतु दुकाने सुरूच ठेवणार! महाराष्ट्र बंदला ‘या’ जिल्ह्यात विरोध

“सकाळी 6 ते रात्री 11 अजितदादांच्या कामाचा धडाका, डिपॉझिट उगीच जप्त होत नाही”

“देशाचे पंतप्रधान लखनऊला आले पण लखीमपूरला आले नाहीत”

“गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत, त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असणार”

पठ्ठ्याने आयफोन 12 मागवला, Flipkart ने भलतंच काही पाठवलं, व्हिडीओ पाहून सगळेच हैराण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More