बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारनं उचललं मोठं पाऊल; पुण्यात ‘एवढ्या’ टन ऑक्सीजनची निर्मिती होणार

पुणे | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव परिणामी वाढती रूग्णसंख्या, त्यामुळं उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यातच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, याचं गांभीर्य लक्षात घेत येत्या काळात राज्यातील ऑक्सिजनचा प्रश्न मिटवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे विभागात ऑक्सिजन निर्मितीचे एकूण 16 नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू देखील करण्यात आली आहे. हे प्रकल्प वेळेत सुरू झाल्यास त्यांना भांडवली खर्चासाठी 10 ते 20 टक्के अनुदान देण्याचंही राज्य सरकारनं ठरवलं आहे.

संबंधित ऑक्सिजन प्रकल्पातून दररोज जवळपास 200 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. दररोज 25 ते 50 टन ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लॅंट 31 डिसेंबरपर्यंत आणि 50 टन प्रत्येक दिवशी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प पुढच्या वर्षी जूनपर्यंत कार्यान्वित झाल्यास त्यांना भांडवली खर्चात 10 ते 20 टक्के अनुदान देण्याचंही राज्य सरकारनं ठरवलं आहे. हे कमाल अनुदान 5 ते 10 कोटी रुपये इतकं असणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

राज्यात ऑक्‍सिजन प्रकल्पाची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकारनं ‘मिशन ऑक्सिजनाचं स्वावलंब धोरण’ तयार केलं आहे. त्यात उद्योगांना ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढच्या 7 ते 9 वर्षांत प्रकल्पाचा एकूण खर्च वसूल होऊ शकतो. कोरोनामुळं ऑक्सिजन प्रकल्पाची संख्या वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचंही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या मिशन अंतर्गत जेजुरी आणि सांगलीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे 2 प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर यवत, मरकळ आणि शिवणे याठिकाणी प्रत्येकी 1 प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी 3 प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

91 वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर यशस्वी मात; रूग्णालयातून डिस्चार्ज

“मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण; आरक्षणाबाबत भाजपचा दुतोंडी चेहरा”

धक्कादायक! मुलाचा बाप कोण हे शोधण्यासाठी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह काढला बाहेर

भंडाऱ्याची उधळण करत भाजप आमदार महेश लांडगेंचा डान्स, पाहा व्हिडीओ

दिल तो बच्चा है जी! कॅरम खेळता-खेळता दोन म्हताऱ्यांमध्ये तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More