“शरद पवार मुख्यमंत्री, विलासराव पत्र घेऊन आले अन्…”, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ काॅंग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे आपल्या वक्तव्यांनी धुमाकूळ माजवतात. शिंदे कायम जुन्या आठवणी सांगताना काही किस्से देखील सांगतात. शिंदे यांनी आता देखील असाच भन्नाट किस्सा सांगितला आहे.
शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा किस्सा शिंदे यांनी सांगितला आहे. पवार हे मुख्यमंत्री असताना त्यावेळी काही लोकांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक पत्र दिल्लीला दिले होते. ते पत्र घेवून विलासराव देशमुख माझ्याकडं आले आणि मला सही करा असं म्हणाल्याचं शिंदे म्हणाले आहेत.
मी न वाचताच त्या पत्रावर सही केली. त्यानंतर मला कळाले की त्या पत्रावर शरद पवारांना मुख्यमंत्री पदावरून काढावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचा अध्यक्ष होतो. मैत्रीत माणुस कसा फसतो याचा अनुभव सांगताना शिंदे यांनी हा किस्सा सांगितला आहे.
दरम्यान, सुशील कुमार शिंदे यांनी अनेकवर्ष केंद्रात मंत्रीपद भुषवलं आहे. ते केंद्रीय गृहमंत्री देखील राहीले आहेत. शिंदे यांच्या या वक्तव्यानं राज्यात चर्चांना उधाण आलं आहे हे मात्र नक्की.
थोडक्यात बातम्या –
भाजपचा ‘हा’ बडा नेता अडचणीत; अटकेची टांगती तलवार कायम
इम्तियाज जलील म्हणतात, “मला आता हालचालींवर लक्ष द्यावं लागेल”
“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका
“संजय राऊत यांना माझ्या पत्नीची मागी मागावीच लागेल”
“राज ठाकरे तुम्ही संभाजी महाराजांच्या चरणी नाक घासून माफी मागा”
Comments are closed.