मुंबई | बाॅलिवूड (Bollywood) असो किंवा टाॅलिवूडमध्ये केव्हा, कधी कोणत्या अफवा उठतील सांगता येत नाही. अनेकदा कोणत्याही अभिनेत्याचं- अभिनेत्रीचं नाव एकमेकांना जोडलं जात. तसंच काहीसं पुन्हा एकदा झाल्याचं पहायला मिळत आहे. अभिनेत्री क्रिती सिनाॅन आणि अभिनेता प्रभास (Actor Prabhas) यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा सुरु होती.
सोशल मिडीयावर त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. याचसंबधी प्रभासच्या टिमने महत्त्वाचा खुलासा केला आहे. क्रिती आणि प्रभास एकमेकांना डेट करत नाही आहेत. त्या दोघांचा साखरपुडा (Engagement) होणार नाहीये. प्रभास आणि क्रिती फक्त चांगले मित्र आहेत. या सगळ्या अफवा असल्याचं प्रभासच्या टिमनं स्पष्ट केलं.
चित्रपट समीक्षक उमेर संधूने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर दावा केला होता की, क्रिती सिनाॅन (Kriti Sanon) आणि प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये (Maldives) व्यस्त होणार आहेत. त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. त्यांच्या या ट्विटमुळे सोशल मीडिया यूजर्सने हे खरं मानायला सुरुवात केली.
एका चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे प्रभास आणि क्रितीच्या अफेअरची चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी देखील क्रितीनं त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत हे देखील तिनं स्पष्ट केलं होतं. तरी देखील या अफवा थांबत नव्हत्या.
महत्त्वाच्या बातम्या-