महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना, चक्क पोलिसांचाच सहभाग असल्यानं मोठी खळबळ
जळगाव | जळगावमध्ये महिला व बालकल्याण विभागामार्फत आशादीप महिला वसतिगृह चालवलं जातं. या वसतिगृहातील संतापजनक प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. गणेश कॉलनीमध्ये असलेल्या वसतिगृहात अन्याय अत्याचार झालेल्या महिला आणि निराधार महिलांची राहण्या-खाण्याची सोय करण्यात आली आहे.
आशादीप या शासकीय वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील इतर पुरुष कपडे काढून वसतिगृहातील महिलांना नाचायला भाग पाडत असल्याचा संतापजनक प्रकार जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी समोर आणला आहे. संबंधित प्रकरणाबद्दल त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे व्हिडिओ पुराव्यासहित तक्रार दाखल केली आहे.
वसतिगृहातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरून काही लोक आणि पोलीस कर्मचारी येऊन असा लज्जास्पद प्रकार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृहात पाहणी दौरा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु. त्यांना वसतिगृहात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी वसतिगृहाच्या खिडकीतून तेथील महिलांशी संवाद साधला आणि झालेला गैरप्रकार प्रशासनाच्या समोर आणला आहे.
वसतिगृहात राहणाऱ्या मुलींवर दबाव आणत त्यांच्याकडून कपडे काढून नृत्य करून घेतले जाते. 1 मार्चला काही पोलिस कर्मचारी असेच येऊन चौकशीच्या नावाखाली त्यांनी असं घाणेरडं कृत्य केल्याची माहिती येथील मुलींनी खिडकीतून तिथे उपस्थित लोकांना दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी तातडीने दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
थोडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ
आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी
धक्कादायक!; मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ
छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित- नाना पटोले
सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी
Comments are closed.