बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाषण चालू असताना अजित पवारांना चिठ्ठी आली, ‘दादा मास्क काढा’; अजित पवार म्हणाले…

मुंबई | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणं ऐकायला लोक एका गावातून दुसऱ्या गावात जातात. सभेत भाषण करताना अजित पवार जोरदार फटकेबाजी करत लोकांना खळखळूून हसवतात. असाच एक किस्सा पंढरपुरातल्या एका सभेत घडला.

अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं ‘दादा मास्क काढा, आवाज व्यवस्थित येत नाही’. त्यावर अजित पवार म्हणाले ‘मी मास्क काढत नाहीये कारण मी जनतेला सांगतोय मास्क लावा. म्हणून मास्क लावून मी बोलतोय. तर हे शहाणं मलाच सांगतंय मास्क काढा म्हणून. याला काय जातंय सांगायला, असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन कल्याण काळे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर त्याचवेळी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी अजित पवारांनी प्रचार सभा घेतली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची पोटनिवडणुक तोंडावर असताना कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात सभेचं आयोजन केलं होतं. यात जयंत पाटील यांनी प्रचारसभेत मास्क काढून भाषण केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांच्यावर भरपूर टिका करण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“कोरोना मानसिक आजार, त्यामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

शेतकऱ्यांना दिलासा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More