पुणे | सत्तातरानंतर दिवसेंदिवस शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत. आमदार-खासदाराची गळती सुरुच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ते डॅमेज भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मेळावा आयोजित करुन शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. लवकरच ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यातच शिवसेनेसाठी (Shivsena) धक्कादायक बातमी समोर आली आहे.
इंदापूरच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल झाला आहे. त्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव विशाल बोंन्द्रे असं आहे. ते पुणे जिल्ह्याचे समन्वयक आहे. महिलेच्या खांद्यावर हात ठेवल्याने त्यांच्यावर विनयभगांचा गुन्हा दाखल झाला आहे. इंदापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात विनयभगांचा गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 14 जुलैला संध्याकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची इंदापूर(Indapur) येथे बैठक पार पडली. ही बैठक संपल्यावर सगळेजण ग्रुप फोटो काढण्यासाठी उभे होते. फोटो काढण्यासाठी उभे राहिले असता विशाल बोंन्द्रे पिडीत महिलेच्या पाठीमागे उभे राहिले होते. उभे राहिल्यानंतर त्यांनी त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. यावरून त्या महिलेने त्यांच्यावर विनयभगांचा गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा गटबाजीतून दाखल करण्यात आल्याचा आरोप संबधित महिलेवर विशाल बोंन्द्रे यांनी केला आहे. हा प्रकार जर 14 जुलैला झाला होता 2 आठवडे ती महिला शांत का बसली होती? असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान या गोष्टीमुळे शिवसेनेच्या अडचणीत भर पडली आहे. या सगळया गोष्टीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा (discussion) रंगली आहे.
थोडक्यात बातम्या
तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
असदुद्दीन ओवैसींचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, म्हणाले…
मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर
‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान
Comments are closed.