नवी दिल्ली | शेअर मार्केटमधील गुंतवणूक (investment) ही फार जोखमीची गोष्ट असते, मात्र यामुळे कधी, केव्हा, कोणाचं नशीब बदलेल सांगता येत नाही. अनेकदा चांगला परतावा मिळण्यासाठी काही वर्षे थांबावी लागतात. शेअर मार्केट मध्ये केलेल्या गुंतवणूकीला थोडा वेळ द्यावा लागतो.
तुम्ही कोणत्या सेक्टर (sector) किंवा कंपनीमध्ये गुंतवणूक करता हेदेखील अनेकदा महत्तवाचे असते. योग्य वेळी आणि योग्य कंपनीत केलेली गुंतवणूक दिर्घकाळाचा फायदा देऊन जाते. त्यामुळे योग्य क्षेत्राबद्दल योग्य माहिती मिळणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे पैसे कमवू शकता.
नुकताच 2023-24 चा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला आहे. याच अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात भरीव गुंतवणूक केली आहे. यामुळे सिमेंटकंपन्यांच्या (Cement) स्टाॅकमध्ये वाढ दिसून आली आहे. तसेच सिमेंट क्षेत्र नेहमीच चांगला परतावा देणारं क्षेत्र राहिलं आहे. त्यामुळे सिमेंट कंपन्यात केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकते.
हल्ली इलेक्ट्राॅनिक्स गॅझेट्सचा वापर वाढला आहे. संपूर्ण देशात सेमीकंडक्टर चिप्सची (Semiconductor chips) मागणी खूप जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या खूप कमी आहेत. मोबाईल फोन, इअर फोन, ब्लूटूथ गॅझेट्स, टिव्ही या इलेक्ट्राॅनिक्स गॅझेट्समध्ये या चिप्स वापरल्या जातात. त्यामुळेे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.
महत्त्वाच्या बातम्या