बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महसूल विभागातील एका अधिकाऱ्याची आत्महत्या

नागपूर | नागपूर पोलीस आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात तीन पोलिस अधिकाऱ्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यानी आत्महत्येपूर्वी त्याच्यासोबत झालेला प्रकार एका चिठ्ठीत लिहून ठेवल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

मूळचे पुण्याचे असणारे सचिन चोखोबा साबळे हे मुंबईला बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथेच त्यांचे सुत नीता मानकर खेडकर हिच्याशी जुळले आणि त्यांच्यामध्ये परस्पर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. हे सर्व प्रकरण माहिती झाल्याने एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर असलेल्या निताच्या पतीने डिसेंबर 2020 मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणात यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण याच्याकडे होता. त्याने नीताशी बोलून या प्रकरणात साबळे या अधिकाऱ्याला तुमच्यामुळे नीताच्या पतीने आत्महत्या केली आहे आणि तुम्ही आरोपी आहात असं सांगायला सुरुवात केली. त्यानंतर जर हे सर्व प्रकरण दाबायचं असेल तर 4 लाख 50 हजार रुपये द्या असं सांगितलं.

चव्हाणच्या एका नातेवाईकाने मुंबईला जाऊन चव्हाणच्या सांगण्यावरून सचिन साबळे यांच्याकडून विविध कारणं सांगुन एकत्रित 9 लाख 50 हजार खंडणी वसूल केली. विविध कारणे देऊन पोलिस सचिनला त्रास देत असताना नीता, तिची मुलगी आणि भाऊ सचिनला लग्न करण्यासाठी धमकीचे फोन करत होते. या सर्व गोष्टीमुळे कंटाळलेल्या सचिन यांनी 18 मार्चला एक चिठ्ठी लिहून आणि त्यामध्ये घडलेला सर्व प्रकार लिहून आपली जिवनयात्रा संपवली.

सचिन साबळे आत्महत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी नीता मानकर, तिची मुलगी आणि भाऊ दादा मानकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि मेश्राम नावाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक चव्हाणला याप्रकरणी निलंबित केलं असून इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टं केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

स्टंट करत गाडीवरच सुरू झाला रोमान्स अन्…, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या तरूणाने वाझेंबाबत केला खळबळजनक दावा!

13 तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More