बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुऱ्हाडीने वार करत एकुलत्या एक मुलाने घेतला बापाचा जीव, धक्कादायक कारण आलं समोर

बुलडाणा | कोरोना काळात सर्व गोष्टी घरुनच सुरु आहेत. कामा पासून ते आभ्यासापर्यंत सर्व काही घरीच सुरु आहे. यामुळे अनेक विद्यार्थी मोबाईलच्या प्रचंड आहारी गेले आहेत. अशातच बुलाडाणा येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकुलता एक असलेल्या मुलाने स्वतःच्याच बापाचा खून केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित आरोपी मुलाचं नाव शुभम गवई असं आहे. तर मृत झालेल्या त्याच्या वडिलांचं नाव गजानन गवई असं आहे. शुभम लाॅकडाऊनमध्ये सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेला होता. यादरम्यान तो सतत मोबाईल वर असायचा. शुभम हा इंजिनेअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तसेच शुभम हा केवळ 21 वर्षाचा आहे..

मोबाईलवर प्रचंड वेळ घालवत असल्याने शुभम आभ्यास करत नव्हता. यावरुनच त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईल कमी वापर आणि आभ्यास कर असं सांगितलं. या गोष्टीचा शुभमला प्रचंड राग आला. याच रागातून शुभमने त्याच्या वडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात गजानन गंभीर जखमी झाले.

दरम्यान, गजानन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार चालु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शुभम हा मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच गजानन यांना आणखी चार मुली असून त्या विवाहीत आहेत. पोलिसांनी शुभम याला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

थोडक्यात बातम्या-

8 वर्षाच्या प्रेमात मिळाला धोका, त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलिसही चक्रावले

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More