बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

पुणे | ‘पुणे तिथे काय उणे’ असं उगीचंच म्हटलं जात नाही. हे आपल्याला अनेक घटनांमधून पाहायला मिळतं. अनेक लोक असं काही करतात की त्यांच्यासाठी हे मात्र आवर्जूनच म्हणावं लागतं. पुणेरी लोकं म्हटलं की पुणेरी घटनांची चर्चाही तशीच असते. अशीच काहीशी घटना सध्या समोर आली आहे.

पुण्यातील एका पठ्ठ्यानं चक्क त्याच्या गाडीचं स्मारक बांधल्याचं पाहायला मिळतंय. यावरुन पुण्यातील लोकांच्या भन्नाट कल्पना शक्तीचं दर्शन होतंय. अहो आपण नेते मंडळीचे स्मारक बांधतो, अभिनेत्याचं स्मारक बांधतो मात्र पुण्यातील या महाशयांनी चक्क गाडीचं स्मारक बांधल्याचं पाहायला मिळतंय.

वाहतूक पोलिसांनी 15 जून रोजी सचिन धनकुडे यांची टू-व्हिलर कोणत्याही पार्किंगचं उल्लंघन न करताही काढून घेतली होती. ही गाडी त्यांना 11 सप्टेंबर रोजी परत करण्यात आली. या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी गणेशोत्सवादरम्यान त्या टू-व्हिलरचं थेट स्मारक बांधलं आहे.

दरम्यान, सचिन धनकुडे यांनी हे स्मारक बांधत पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या स्मारकाच्या देखाव्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या –  

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More