बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् राखी सावंत स्पायडर मॅनचा ड्रेस घालून झोपली रस्त्यात, पाहा व्हिडीओ

मुंबई | सर्वांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री राखी सावंत तिच्या सतत कोणत्या ना कोणत्या व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे. अशातच आता ती पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आली आहे. मात्र यावेळीचा तिचा व्हिडीओ काही निराळाच आहे. या व्हिडीओमध्ये राखीने चक्क स्पायडर मॅनचा ड्रेस परिधान करुन रस्त्यावर डान्स केला आहे.

सध्या वूट या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर बिग बाॅस हा रियालीटी शो चालू आहे. या शोमध्ये बिग बाॅस 14च्या कंटेस्टंटना पाहुणे म्हणून बोलावलं जात आहे. अशातच राखीने देखील बिग बाॅसच्या घरात प्रमुख उपस्थिती लावली. मात्र यावेळी तिने स्पायडर मॅनचा ड्रेस परिधान केला होता.

स्पायडर मॅनचा ड्रेस परिधान केलेल्या राखीने तिच्या चेहऱ्याच्या एका साईडला स्पायडर मॅनचा लाल रंगामध्ये मेकअप करुन लुक तयार केला आहे. बिग बाॅसच्या घराच्या बाहेर पोचताच राखीने सर्वांसमोर एक डान्स देखील केला.

दरम्यान, बिग बाॅसच्या घराबाहेर केलेला राखीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओने लोकांना पोट धरुन हसण्यास भाग पाडला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”

विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह इन संबंध अवैध- उच्च न्यायालय

“आपला देशच भारीये, आपलं नशीब आहे की आपण भारतात राहतो”

“अफगाणीच लढायला तयार नाहीत मग आम्ही आमच्या सैनिकांचे प्राण संकटात का टाकू?”

“राज्यपाल महोदय आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More