Top News देश

अशाप्रकारे ‘या’ शिक्षिकेनं 13 महिन्यात कमावले 1 कोटी रुपये वेतन

लखनऊ | उत्तर प्रदेशातील एका शिक्षिकेनं १३ महिन्यात कथित १ कोटी रुपये वेतन कमावल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ वेगवेगळ्या शाळांमध्ये काम करत असल्याचं दाखवून हा प्रकार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

शिक्षकांचा डाटाबेस तयार करत असताना ही धक्कादायक घटना उजेडात आली. आता याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकाराची एकच चर्चा सुरु झाली आहे.

अनामिका शुक्ला ही शिक्षिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विज्ञान विषय शिकवते. तिच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, आंबेडकरनगर, अलिगड, सहारनपूर, बागपत अशा जिल्ह्यांतील केजीबीव्ही शाळांमध्ये अनामिकाची पोस्टिंग सापडली आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि त्यांना दरमहा ३० हजार रुपये पगार दिला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कस्तुरबा गांधी शाळा आहे. त्यामुळे अशाप्रकारे आणखी जण फसवणूक करत नाहीत ना? याचीही चौकशी केली जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”

महत्वाच्या बातम्या-

अडचणीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ आमदारानं सोडली साथ

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना

पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या