बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वक्तव्य मागे घ्या, अन्यथा… ब्राह्मण महासंघाचा सुजय डहाकेला इशारा

मुंबई | ब्राह्मण कलाकारांबद्दल दिग्दर्शक सुजय डहाकेनं केलेल्या वक्तव्याचा ब्राह्मण महासंघाने निषेध केला आहे. डहाके यांचं वक्तव्य निव्वळ मूर्खपणाचं आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचा हा उद्योग आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

सुजय डहाके यांनी लगेच हे वक्तव्य मागे घ्यावं अन्यथा भविष्यामध्ये त्यांच्या एखाद्या चित्रपटावर काय कारवाई करायची याचा विचार करू, असा इशारा आनंद दवे यांनी सुजय डहाकेला दिला आहे.

चित्रपट क्षेत्र सर्वांसाठी खुलं आहे आणि रहावं अशी आमची भूमिका आहे. हे कुणाचीच मत्तेदारी नसलेलं क्षेत्र आहे ते तसंच रहावं, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डहाके यांच्या शाळा चित्रपटामध्ये अनेक ब्राह्मण कलाकार होते अशी आठवणही आनंद दवे यांनी सुजय डहाकेला करून दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

‘विधानसभेत लोकायुक्त कायदा मंजूर करा’; अण्णा हजारेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

योगींसोबतच्या त्या चर्चेत काय झालं?; संजय राऊत सांगतात…

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील भाजपचे 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील

सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा

…तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो; प्रकाश राज यांनी सांगितला उपाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More