मुंबई | भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत मालिका आपल्या खिशात घातली आहे. मालिका होण्यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी या मालिकेच्या निकालाबाबत काही वक्तव्य केली होतीत.
ज्यामध्ये म्हटलं होतं की, पहिल्या कसोटीनंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघ कसा असेल याची कल्पना केली आहे का?, दौऱ्यावर असलेला भारतीय संघ पाहता ऑस्ट्रेलिया भारताला व्हाईटवॉश देईल, अशी वक्तव्ये ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आजच्या निकालानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना चिमटा काढला आहे.
तुम्हाला तुमची वाक्य कशी खायला आवडतील?, शेकून, तळून, भाजून…. चपातीसह किंवा डोसासह?, असा सवाल आनंद महिंद्रा यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून ऑस्ट्रेलियन दिग्गजांच्या कमेंटचा फोटो पोस्ट केला आहे.
भारतीय संघाने केलेल्या पराक्रमाने आता या खेळाडूंना त्यांची वक्तव्ये माघारी घ्यावी लागलीत तर पुढच्यावेळी अशी पांचट वक्तव्ये करत भारतीय संघाला कमी लेखू नये, असंच काहीसं प्रदर्शन भारताने केलं आहे.
How would you like to eat your words? Grilled, fried, baked…wrapped in a chapati or dosa? 😊 pic.twitter.com/nZs3Z2N8Fa
— anand mahindra (@anandmahindra) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
‘गाबा’चा घमंड उतरवलाच! भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकली मालिका
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील- उद्धव ठाकरे
कांगारूंचा पराभव केल्याने पंतप्रधान मोदींचीही भारतीय संघावर कौतुकाची थाप; म्हणाले..
अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांवर रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…
ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यानं भारताच ‘हे’ मॅसेजिंग अॅप कायमचं होणार बंद