13 वर्षांच्या मुलीच्या प्रसंगावधानाने आनंद महिंद्रा झाले चकित; थेट दिली नोकरीची ऑफर

Anand Mahindra | सध्याच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला तर माणूस चांगल्या पातळीवर जात यश मिळवेल. कधी कोणतं तंत्रज्ञान केव्हा कामाला येईल हे सांगता येणार नाही. अलेक्सा नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर एका 13 वर्षाच्या मुलीने योग्य त्यावेळी केला आणि आपल्या 15 महिन्यांच्या बहिणीचे माकडापासून प्राण देखील वाचवले आहेत. यामुळे आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी थेट नोकरीची ऑफर दिली आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत 13 वर्षाच्या मुलीला नोकरीची ऑफर दिली.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

एका 13 वर्षाच्या मुलीने आपल्या माकडापासून बहिणीचे संरक्षण केलं आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील असून बस्ती या जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यामध्ये माकडांचा उच्छाद आहे. 15 महिन्यांचे बाळ असलेल्या खोलीमध्ये माकड गेले असता. त्यावेळी अलेक्सा डिव्हाईसच्या माध्यमातून कुत्र्याचा आवाज काढण्याची कमांड दिली. त्यानंतर अलेक्साच्या डिव्हाईसमधून कुत्र्याचा आवाज आला. त्यावेळी तिची हुशारी कामी आली. माकड त्या खोलीतून बाहेर गेले. यावेळी शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते. याचं उत्तम उदाहरण आहे.

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. मुलीचे कौतुक देखील होतेय. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये 13 वर्षाच्या मुलीने आपल्या हुशारीने आपल्या आपल्या लहानग्या बहिणीचा जीव वाचवल्याने नोकरीच्या ऑफरबाबत ट्वीट केलं आहे.

आनंद महिंद्रांचं ट्वीट

ट्वीट करत आनंद महिंद्रा यांनी मुलीचं कौतुक केलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्वीटद्वारे माहिती नमूद केली आहे. “आपण तंत्रज्ञानाचं गुलाम होणार की मालक हा प्रश्न आहे. तंत्रज्ञान हे मानवी बुद्धीला नेहमी प्रोत्सहान देणारं असल्याचं आज अधोरेखित झालं. या मुलीमध्ये नेतृत्वगुण आहे. शिक्षण झाल्यानंतर मुलगी जर कार्पोरेट क्षेत्रामध्ये येणार असेल तर महिंद्रा राईजमध्ये आम्ही तिच्यासोबत काम करणार आहोत”, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.


बस्ती जिल्ह्यातील आपल्या लहनग्या बहिणीला वाचवणाऱ्या मुलीचं नाव निकीता आहे. तिनं केलेल्या कामगिरीचं आनंद महिंद्रांनी कौतुक केलं आहे. निकीतीनं केलेल्या कामगिरीमुळे आता आनंद महिंद्रा प्रभावित झाले आहेत.

News Title – Anand Mahindra Offer Job To 13 years old girls For Save Her Child Doughter From Monkey

महत्त्वाच्या बातम्या

प्रीति झिंटा पंजाबच्या ‘या’ खेळाडूच्या पडलीय प्रेमात, खास पोस्ट करुन म्हणाली…

भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेत मोठी खदखद, एकनाथ शिंदेंच्या बैठकीत हायहोल्टेज ड्रामा

देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांना नारळ, वंचितनं केली मोठी घोषणा!

रखरखत्या उन्हात ‘ही’ पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर मिळेल भरपूर एनर्जी

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!