बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हे एक दिवस देशाचा तालिबान करतील; आनंद महिंद्रा भाजप नेत्यांवर भडकले

नवी दिल्ली | महात्मा गांधींचा वारसा आमच्यासाठी पवित्र आहे आणि त्यांचा अपमान म्हणजे अफगानिस्तानात तालिबानकडून मूर्ती तोडण्यासारखं आहे, असं ट्विट करत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी भाजप नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

75 वर्षांपासून भारत ही महात्मा गांधींची भूमी राहिली आहे. महात्मा गांधी हे मशालीसारखे आहेत. जेव्हा जगाची नैतिकता हरवली, तेव्हा आम्हाला दारिद्र्यात ढकलण्यात आलं होतं पण तरीही आम्ही श्रीमंत होतो कारण अमच्याकडे बापू होते.  जगभरात कोट्यवधी लोकांना त्यांनी प्रेरित केलं आहे, असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

काही दिवसांपुर्वी भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, अनेक भाजप नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

-ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते, राहुल गांधी खोटं बोलत आहेत; मोदींच्या टीकेवर राहुल तोंडघशी!

-मोबाईल आणि सोशल मीडियामुळे युवकांमध्ये सैराट वृत्ती वाढत आहे- नांगरे पाटील

-तू खिंच मेरी फोटो!… केदारनाथ मंदिरातील फोटोंवरुन मोदींची सोशल मीडियात खिल्ली

-भाजप माझ्या जीवावर उठलंय, ते माझी हत्या करणार आहेत- अरविंद केजरीवाल

-आता जनता मूर्ख बनणार नाही; या फोटोवरुन राबडींचा मोदींना टोमणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More