बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा

मुंबई | महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउन वाढवण्याच्या मुद्दावर पुन्हा एकदा आपली चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाउनसारखे निर्णय आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरू शकतात, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये एका लेखाचा सुद्धा दाखला दिला आहे. ज्या लेखात कोविड-19 ची लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाउनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.

लॉकडाउन वाढवल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थच ओढवणार नाही तर त्यामुळे दुसरं गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकतं, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

लॉकडाउन आणखी बऱ्याच काळासाठी वाढवला तर आर्थिक हाराकिरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं आनंद महिंद्रा या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाले होते.

 

ट्रेंडिंग बातम्या-

आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरु नका- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

मजुरांनंतर आता राहुल गांधी यांनी केली टॅक्सी चालकाशी चर्चा

मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंची राज्यपालांकडे मागणी

“महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More