महाराष्ट्र मुंबई

कोरोना व्हायरस जगाला ‘या’ चार गोष्टी शिकवणार- आनंद महिंद्रा

मुंबई | चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. भारतातही काही 25 संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. पण या आजारामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकता येईल असं मत देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. यामध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देईल. तसेच डिजीटल परिषदचे प्रमाण वाढेल, कंपनीच्या मीटिंगच्या ऐवजी व्हिडीओ कॉलवरुनच संपर्क साधण्याचे प्रमाणात वाढ होईल, विमान वाहतुकीच्या प्रमाणात घट होईल आणि यामुळे प्रदूषण देखील टाळता येईल, असं मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना व्हायरस टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं देखील नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“कोण अमृता फडणवीस?, त्यांच्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

महत्वाच्या बातम्या-

पत्नीच्या हत्येप्रकरणी पती गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर पत्नी सापडली प्रियकरासोबत

सामनात आलेल्या ‘त्या’ दोन बातम्या अन् भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या