बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंद महिद्रांनी नीरज चोप्राची केली बाहुबलीशी तुलना; म्हणाले….

मुंबई | ऑलिम्पिमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देत भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने जवळपास 12 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. नीरजने केलेल्या कामगिरीमुळे देशात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. राजकीय नेते, मंत्री, पंतप्रधान, माजी खेळाडू आणि अभिनेते नीरजचं कौतुक करत आहेत. अशाच प्रकारे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरजचं कौतुक करताना त्याला ‘बाहुबली’ची उपमा दिली आहे.

आनंद महिंद्र यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी नीरजला बाहुबलीची उपमा देत, आम्ही सर्वजण तुझ्या सैन्यात आहोत, असं म्हटलं आहे. नीरजेही बाहुबलीप्रमाणे 87.58 मीटर लांब भाला फेकला आहे.

नीरज चोप्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने संस्मरणीय असा खेळ केला. युवा नीरजने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नीरजच्या संयमाचं, धैर्याचं आणि अतुलनीय प्रदर्शनाचं कौतुक, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावलं होतं. नीरज चोप्रा हा भालापेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारा पहिला खेळाडू झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

नीरज चोप्राने पूर्ण केलं भारताचं सोनेरी स्वप्न, भालाफेकमध्ये सुवर्णपदक!

महापौरांच्या कार्यालयात भूत? गार्डसोबत घडला भयानक प्रकार, महापौरांनीच शेअर केला व्हिडीओ!

वाह रे पठ्या! बजरंगने मिळवलं कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर एकहाती विजय

खळबळजनक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

पॉर्न पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव, पत्नीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More