बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धवजी, समस्या ही आहे की…’; लॉकडाऊनवरून आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मुंबई | कोरोना सध्या पुन्हा डोक वर काढत आहे. राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत्या आलेखाप्रमाणे वाढत चालला आहे. प्रशासनाने खबरदारी आणि हा वाढता फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी तर काहींमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. रूग्णांच्या वाढत्या आकड्यांमुळे राज्यात लॉकडाऊन होणार असल्याचं बोललं जात आहे. यावरूनउद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन मुख्यमंत्री आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होत असल्याचं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आलं होतं. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करू, असा सल्लाही आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज्यातील आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

दरम्यान,राज्यात एकुण 20 हजार 854 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आज पर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 21 लाख 54 हजार 253 एवढी झाली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 85.71 टक्के झाल्याचं दिसुन येत आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 3 लाख 36 हजार 584 सक्रिय रुग्ण आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

जाणुन घ्या… महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पेट्रोलपंप, हॉटेलसाठी नवीन नियमावली

राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूीवर पुण्याच्या महापौरांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More