मेडिकल शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकून पडलेले सर्व विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले होते.
देशात चांगले मार्क्स असूनही मेडिकलला अॅडमिशन मिळत नाही. प्रायव्हेट कॉलेजपेक्षा युक्रेनमधील मेडिकल शिक्षणाचा खर्च कमी आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मेडिकल विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत भारतातील मेडिकल कॉलेजच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली. तर महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या विचारात असल्याचंही आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. आनंद महिंद्रा यांनी टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांना टॅग करत महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल शिक्षण संस्था स्थापन करू शकतो का?, असा प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, आनंद महिंद्रांच्या या ट्विटमुळे येत्या काळात महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हे कॉलेज सुरू झालं तर विद्यार्थ्यांना परदेशात जावं लागणार नाही अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
I had no idea that there was such a shortfall of medical colleges in India. @C_P_Gurnani could we explore the idea of establishing a medical studies institution on the campus of @MahindraUni ? https://t.co/kxnZ0LrYXV
— anand mahindra (@anandmahindra) March 3, 2022
थोडक्यात बातम्या-
“खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे”
संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही…
“हाताची घडी तोंडावर बोट याचं मोठं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे”
पुणेकरांनो सावधान, गेल्या 24 तासांतील ओमिक्रॉन रूग्णांची चिंताजनक आकडेवारी समोर
“सरकार जेवायला बोलवतं आणि ताटात काहीच नसतं”
Comments are closed.