नवी दिल्ली | अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी तरूणांनी आंदोलन केलं आहे. हिंसक वळण घेतलं आहे. यानंतर महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.
अग्निपथ योजनेमुळे जी हिंसा होतआहे त्यांने मी दु:खी आहे. गेल्यावर्षी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. यामुळे मी आनंदी होतो. यामुळे अग्निविरांना मिळणारी कौशल्य आणि शिस्त त्यांना रोजगारक्षम बनवतील. या रोजगारक्षम तरूणांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरीची संधी दिली जाईल, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
तुमच्या कंपनीत कोणत्या पदावर नोकरी देणार?, असा सवाल एका युजरने केला. यावर महिंद्रा यांनी उत्तर दिलं. टीमवर्क, शारिरिक प्रक्षिशण, लीडरशीप क्वालिटी असणाऱ्या अग्निवीरांना लोक प्रशासन, पुरवठा साखळी या कोणत्याही ठिकाणी काम करता येईल, असं ते म्हणाले.
14 जून रोजी अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विविध 11 राज्यात निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनाने तीव्र रूप धारण केलं. काही ठिकाणी जाळपोळ ही करण्यात आले आहेत. इतक्या घडामोडी नंतरही योजना मागे घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या
आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना!
‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; बिचुकलेंनी सांगितलं गणित
‘सदाभाऊंच्या जीवाला धोका आहे असं वाटत नाही पण..’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
“कैद्यांनाही मतदानाचा अधिकार मग आमच्या मलिकांना आणि देशमुखांना का नाही?”
नीरज चोप्राचा सोनेरी विजय, केला आणखी एक अप्रतिम पराक्रम
Comments are closed.