बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंद महिंद्रांचा दिलदारपणा; हात-पाय नसलेल्या ‘त्या’ व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

मुंबई | उद्योगपती आनंद महिंद्रा (Bussinessmen Aanand Mahindra) हे अनेकवेळा गरजूंना मदत करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या मनाचा मोठेपणा समोर आला आहे. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हि़डीओत दिसणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला आनंद्र महिंद्रा यांनी मोठी मदत दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “मला माझ्या टाईमलाईनवर हा व्हिडीओ मिळाला. या व्हिडीओबद्दल मला फारशी माहिती नाही. हा व्हिडीओ किती जुना आहे आणि कुठला आहे, याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण मला या माणसाला पाहून आश्चर्य वाटते”,असं ते म्हणाले आहेत.

“या माणसाने त्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामनाचं केला नाही. तर तो त्याच्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी आहे. राम या व्यक्तीला @Mahindralog_MLL च्या लास्ट माईल डिलीव्हरी या व्यवसायात नोकरीवर घेता येईल का?” असा प्रश्न विचारतं महिंद्रांनी या व्यक्तीला नोकरीची ऑफरचं दिली आहे.

दरम्यान, महिंद्रा यांनी याआधीही अनेकांना मदत केल्या आहेत. ते अशा गरजू किंवा होतकरू लोकांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. याआधी त्यांनी साताऱ्याच्या दत्तात्रय लोहार यांना बोलेरो देण्याची घोषणा केली होती. लोहार यांनी घरच्या घरी जुगाड जिप्सी बनवली होती.

 

थोडक्यात बातम्या-

कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना – नारायण राणे

“नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे, पण मी का सांगू?”

“कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा”

स्थापना दिनीच काँग्रेसचा झेंडा पडला खाली, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

‘पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More