बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाखोंच्या आयुष्यातील आनंदसागर हरपला, शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली!

बुलडाणा | संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. मागील काही दिवसांपासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी 5 वाजता शिवशंकरभाऊ यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाटील यांनी संत गजानन महाराज यांची बराच काळ सेवा केली होती. तसेच त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे संभाळला आहे. त्यांनी गरजू लोक आणि आदिवासी लोकांच्या हितासाठी मोलाचं काम केलं.

शिवशंकरभाई पाटील यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या शेतात करण्यात येणार आहे. अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी कोणीही गर्दी करु नये. तसेच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात येईल, असं संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री अशोक चव्हण यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी ट्वीट करत शिवशंकरभाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.

थोडक्यात बातम्या –

“भाजप काँग्रेसचं नाव पुसायला निघाल्यामुळेच राज्यपालसुद्धा पंडित नेहरुंबद्दल काहीही बरळतात”

“राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे त्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे”

घाई करा! आगामी काळात सोन्याचे दर दुप्पट होणार, वाचा आजचे दर

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More