बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

पंढरपूर | देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यानंतर हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय, असा इशारा गायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

आनंद शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. यावेळी आनंद शिंदे यांनी गाण्यातून फडणवीसांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होतं. यावरून आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदेंनी मंगळवेढ्यात हजेरी लावली.

थोडक्यात बातम्या-

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहितीये”

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

हारी बाजी को जितना हमें आता है!; शेवटच्या 5 षटकांमध्ये चमत्कार झाला!

संचारबंदीकाळात सरकारकडून कोणाला किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More