Top News अमरावती महाराष्ट्र

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरोधात काही कागदपत्र सादर करत चौकशी करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आनंदराव अडसूळ यांनी राणांवर टीका केली आहे.

राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी आहे. ज्यावेळी अंगाशी काही गोष्टी येतात तेव्हा दुसऱ्याला कसं बदनाम करता येईल हा प्रयत्न ते करत असल्याची टीका अडसूळ यांनी केली आहे.

जातप्रमाणपत्राचे प्रकरण आपल्या विरुद्ध जाणार यांची कल्पना त्यांना आहे. निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य त्यामुळे आमदारकीसुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे खासदारकी आणि आमदारकी जाणार या भीतीने ते चिलबिल झाले असल्याचं अडसूळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सिटी को-ऑप बँकेत घोटाळ्याबाबत मी स्वत: तक्रार केली आहे. त्या प्ररणातील चौकशीला आपण सामोर जाण्यास तयार असल्याचंही अडसूळांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं”

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द

ऐतिहासिक! पुरूष कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अंपायर

“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे”

“मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजप 400चा आकडा करणार क्रॉस”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या