Anant Ambani Radhika Merchant Wedding | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा काही महिन्यांपूर्वीच जामनगर येथे पार पडला. 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडलेल्या या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी ते आंतरराष्ट्रीय दिग्गजांनी हजेरी लावली होती.
जामनगर येथे झालेल्या या सोहळ्यात पाण्यासारखा पैसा अंबानींनी खर्च केला होता.अगदी जेवणापासून ते सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्टींची यावेळी मीडियामध्ये जोरदार चर्चा झाली. आता अनंत आणि राधिका यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. इटलीतील एका आलिशान क्रुझवर हा सोहळा होतोय. यानंतर त्यांचा विवाहसोहळा होईल.
राधिका-अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 12 जुलैरोजी अनंत आणि राधिका एकमेकांशी लग्नगाठ बांधतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून त्यात औद्योगिक आणि बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभाही होणार आहेत.
तब्बल तीन दिवस हा शाही सोहळा पार पडणार आहे. राधिका आणि अनंत हिंदू वैदिक पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नासाठी पाहुण्यांना खास ड्रेसकोड ( Anant Ambani Radhika Merchant Wedding) देखील ठेवण्यात आला आहे.यासाठी ड्रेसकोड इंडियन फॉर्मल असा निवडण्यात आला आहे.
इटलीत शानदार क्रूझवर होतोय दुसरा प्री-वेडिंग सोहळा
तर, 14 जुलैरोजी लग्नाचे रिसेप्शन पार पडेल. याकरता ड्रेसकोड इंडियन चिक असा आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. सध्या इटलीमध्ये क्रूझवर यांचा दूसरा प्री-वेडिंग सोहळा होत आहे.
अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा हा एका आलिशान क्रुझवर इटली ते फ्रान्स असा प्रवास करत होत आहे. बॉलीवूड मधील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी इटलीला दाखल झाले आहेत. या क्रुझवर 800 पाहुण्यांसाठी 600 कर्मचारी क्रूझवर उपलब्ध असल्याची माहिती आहे. आता अनंत आणि राधिका ( Anant Ambani Radhika Merchant Wedding) यांची लग्न पत्रिका चर्चेत आलीये.
News Title – Anant Ambani Radhika Merchant Wedding
महत्वाच्या बातम्या-
पुणे अपघाताला नवं वळण; आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा
‘सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तरी…’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
पुणे अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर, त्या रात्री विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरेंना…
शाहरुख खान ‘या’ गोष्टीत कधीही यशस्वी होणार नाही; गौतम गंभीर असं का म्हणाला?