बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार आमचे नेते नाही म्हणणाऱ्या अनंत गीतेंना तटकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | राजकारणात कधी कोण कोणावर टीका करेल सांगता येत नाही. आपली उभी राजकीय वाटचाल एकत्र केलेले मित्र अचानक विरोधक होवू शकतात. कायम विरोधात असलेले चेहरे एकत्र येवू शकतात. हे फक्त राजकारणातच घडू शकत. 2019 विधानसाभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अगदी असचं झालं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. पण अजूनही मनाने या पक्षातील नेते एकत्र येवू शकले नाहीत हे अनंत गीते यांच्या वक्तव्यावरून लक्षात येतं.

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनंत गीते यांनी रायगड या त्यांच्या मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचा जन्मच पाठीत खंजीर खुपसुन झाला आहे. शरद पवार आमचे नेते नाहीत असतील त्यांचे असतील, असं वक्तव्य गीते यांनी केल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. गीते यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी जोरदार हल्ला चढवताना गिते यांचं वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून केलं आहे, अशी टीका केली आहे.

गत 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाही अशी अवस्था अनंत गीते यांची झाली आहे, अशी जोरदार टीका खासदार तटकरे यांनी केली आहे. अनंत गीते आणि सुनिल तटकरे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून राज्यात ओळखलं जातात. खूप दिवस गायब असलेल्या गीते यांनी मोठ वक्तव्य करत पुन्हा राजकारणात सक्रियता दाखवली आहे.

अनंत गीते यांच्या वक्तव्यावर शिवसेनेनं आपली भुमिका स्पष्ट करावी असं तटकरे म्हणाले आहेत. अनंत गीते बोलल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. ज्यांना राजकीय महत्व भेटत नाही ते असले वक्तव्य करत असतात. या शब्दात तटकरे यांनी गीते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनंत गीते यांच्या राजकीय वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते आपापली मतं मांडत आहेत.

थोडक्यात बातम्या 

“बाॅलिवूड चित्रपटांमध्ये माझा फक्त फर्निचरसारखा वापर केला”

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

FD धारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 3 बॅंकांनी बदलले एफडीचे व्याजदर

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही’; पाटलांच्या टीकेवर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More