Anant-Radhika | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा काही महिन्यांपूर्वीच जामनगर येथे पार पडला. 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडलेल्या या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी ते आंतरराष्ट्रीय दिग्गजांनी हजेरी लावली होती.
आता अनंत आणि राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा एका भव्य क्रूझवर पार पडतोय. इटलीमध्ये हा सोहळा रंगणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा शानदार बनवण्यासाठी हॉलिवूड स्टार्स आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शकिरा आणि कॅटी पेरी करणार परफॉर्मन्स
जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगला रिहाना आणि दिलजीत दोसांझ या गायकांनी स्टेज गाजवलं होतं. त्यासाठी त्यांनी भरमसाठ फी देखील आकारली. आता दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये देखील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकांचा परफॉर्मन्स होणार आहे. यासाठी अंबानी कुटुंबाने मोठी किंमत देखील मोजली आहे.
आता दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात हॉलिवूड (Anant-Radhika) स्टार शकीरा, कॅटी पेरी आणि अमेरिकन बँड बॅकस्ट्रीट बॉईज चार-चाँद लावणार आहेत.काही मीडिया रिपोर्टनुसार, कोलंबियन गायिका शकीरा हिने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगसाठी भरघोस फी आकारली आहे. एका परफॉर्मन्ससाठी ती 10 ते 15 कोटी रुपये आकारते.
कोणाला मिळाले सर्वाधिक पैसे?
शकीरा तर जास्त फिस आकारतेच. मात्र, याबाबतीत गायिका कॅटी पेरी देखील मागे नाही. तीने सुमारे 45 कोटी रुपये आकारले असल्याची माहिती आहे. अमेरिकन बँड बॅकस्ट्रीट बॉईजच्या फिसबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी 4 ते 7 कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.
मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगरमध्ये तीन (Anant-Radhika) दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हासुद्धा काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी परफॉर्म करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी रिहानाने तब्बल 74 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं गेलं होतं.
News Title – Anant-Radhika second pre-wedding Shakira will perform
महत्वाच्या बातम्या-
जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी
अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चेवर अखेर मलायकाने सोडलं मौन; म्हणाली..
तुम्हाला माहितीये का? 1 जूनला सरकारी बड्डे का असतो?
4 जूनला कुणाचं सरकार येणार?; सट्टा बाजाराची भविष्यवाणी आली समोर
मान्सूनची दणक्यात एंट्री; पुढील दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी