Anant-Radhika Wedding | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल 12 जुलैरोजी विवाह सोहळा पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. संपूर्ण जगाने या अभूतपूर्व सोहळ्याचा झगमगाट बघितला. मुकेश अंबानी यांनी या लग्नावर जवळपास 2000 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे. काल विवाह सोहळा (Anant-Radhika Wedding ) पार पडला. त्यानंतर अजून तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.
अशात राधिकाचा लग्नामधील लुक चर्चेत आला आहे. अंबानी यांची सून म्हटल्यावर राधिकाचा थाट देखील राजेशाही असणार. लग्नात नववधू राधिकाने तर सोन्याचा लेहंगा परिधान केल्याने सर्वांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. या लेहेंग्याची किंमत तर कोटींच्या घरात आहे. याचबरोबर राधिकाने घातलेले दागिने देखील बेशकिमती होते.
नववधूच्या लेहेंग्यावर सोन्याच्या तारेचे भरतकाम
नववधू राधिका मर्चंटने लग्नाच्या मिरवणुकीपासून ते लग्न समारंभापर्यंत अतिशय सुंदर लेहेंगे आणि दागिने परिधान केले होते. तिने तिच्या पाठवणीच्या वेळी घातलेला लेहेंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. गळ्यात पाचू आणि हिरे जडवलेल्या हाराने तिचे रुप आणखीनच खुलले होते. सोशल मीडियावर राधिकाच्या या लेहेंग्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
मनीष मल्होत्राने राधिकासाठी हा सुंदर लाल लेहेंगा (Anant-Radhika Wedding ) तयार केला आहे. या लेहेंगामध्ये मल्टीपल पॅनल्स जोडले गेले आहेत, बनारसी ब्रोकेडने बनवलेल्या या लेहेंग्यावर सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे रंग टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला.म्हणजेच प्रकाशात कधी लालसर रंग दिसेल, कधी नारिंगी तर कधी पिवळा.
कोट्यवधींच्या दागिन्यांमध्ये दिसली राधिका
इतकंच नाही तर,लेहेंगा रॉयल दिसण्यासाठी त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी देखील करण्यात आली होती.लेहेंग्यासह सोनेरी चोली खूपच सुंदर दिसत होती. लेहेंगाची चोळी बॅकलेस ठेवत, दोन्ही बाजू एकाच फॅब्रिकच्या तीन पट्ट्यांनी जोडल्या गेल्या. यावरही सोन्याचे काम झाले. लग्नात राधिका अंबानीने तिच्या डोक्यावर सुंदर गुलाबी नक्षी (Anant-Radhika Wedding )असलेला बनारसी दुपट्टा घातला होता. ज्यामुळे राधिका एका राजकुमारी सारखी दिसत होती.
राधिकाच्या दागिन्यांची देखील चर्चा होते आहे. राधिकाने कुंदन बेस आणि पोल्कीने सजवलेला चोकर नेकलेस घातला होता.यासोबतच तिने हिरा आणि पाचूने बनवलेला खूप महागडा हारही घातला होता. तसेच तिने हातात हिऱ्याच्या बांगड्या होत्या. राधिकाच्या या लुकची सध्या जोरदार चर्चा आता होऊ लागली आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहेत.
News Title- Anant-Radhika Wedding Bride lehenga
महत्वाच्या बातम्या-
अनंत-राधिका अडकले विवाहबंधनात; लग्नाचा पहिला फोटो आला समोर
…अन् हे संविधान वाचवणार?, मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची कॉँग्रेसवर टीका
आज ‘या’ राशीचे लोक होतील मालामाल!
“पंकजा मुंडे यांचा भाजपच्या नेत्यांनीच गेम…”, ‘या’ नेत्याच्या दाव्याने राज्यभर खळबळ
लग्न करायचं तर ‘अशा’ मुलींसोबतच करा; भाग्यही उजळेल आणि कायम आनंदी राहाल