Anant-Radhika Wedding | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चेंटसोबत आज 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाआधीचे अनेक कार्यक्रम पार पडले आहेत.संगीत, हळदी आणि मेहंदी कार्यक्रमात अनेक दिग्गज लिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.
आज सप्तपदी होण्यापूर्वी अंनत आणि राधिका यांच्यासाठी खास (Anant-Radhika Wedding)पूजा ठेवण्यात आली होती. संपूर्ण जगभरात अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा आहे. आज लग्नासाठी तर जगभरातून पाहुणे येणार आहेत.
अनंत-राधिका आज अडकणार विवाह बंधनात
अंनत आणि राधिका यांचं लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नापैकी एक आहे. मुकेश अंबानी यांनी मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं दिसतंय. लग्न पत्रिका पासून ते पाहुण्यांना देण्यात येणारे गिफ्ट तसेच खाण्या-पिण्यावर देखील कितीतरी कोटी खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे.
आकाश आणि ईशा यांच्या लग्नाच्या तुलनेत अनंत अंबानीच्या (Anant-Radhika Wedding)लग्नावर अधिक पैसा अंबानी कुटुंबियांनी खर्च केलाय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या पहिल्या प्री-वेडिंग सेरेमनीवरच जवळपास 1,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
लग्नात जवळपास साडे तीन कोटींचा खर्च?
हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी हजेरी लावली होती.तर, दुसरा प्री-वेडिंग सोहळा हा इटलीमध्ये झाला होता. याची पार्टी क्रुझमध्ये झाली होती. यामध्येही मनोरंजन आणि व्यवसाय जगतातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. तेव्हा अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाहुण्यांसाठी 10 चार्टर फ्लाइट्स बुक केल्या होत्या.
काही मीडिया रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाने (Anant-Radhika Wedding) इटलीमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यावर जवळपास 500 कोटी रुपये खर्च केले होते. अशा प्रकारे अंबानी कुटुंबियांनी लग्नात जवळपास दीड कोटी रुपये खर्च केले. आज विवाहसोहळा पार पडणार आहे. विवाह झाल्यानंतर देखील अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे लग्नात अंबानी कुटुंबियांनी जवळपास साडे तीन कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती आहे.
News Title – Anant-Radhika Wedding Cost 3000 Crore
महत्वाच्या बातम्या-
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गणपत गायकवाड तुरूंगाबाहेर येणार?
अजित पवार गटातील नेत्याकडून अनिल परब यांचं कौतुक!
आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; 10 ग्रॅमसाठी आता..
देशात ‘या’ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी मिळणार सवलत!
दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून मोठा दिलासा; अखेर..