Ananya Panday | बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हे कायमच चर्चेत असणारं एक नाव आहे. अनन्या पांडे हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनन्या पांडेने वयाच्या 18 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. मात्र तिला काही गोष्टींसाठी ट्रोल केलं गेलं. यानतंर तिने आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष दिलं.
अनन्या पांडेने हिप सर्जरी केली?
अनन्या पाच वर्षांपासून बॉलीवूडचा भाग आहे आणि तिला तिच्या लूकसाठी अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलंय. अनन्या पांडेने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वतःचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये अनन्याने राखाडी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. हलका मेकअप आणि बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला. मात्र फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनन्या पांडेवर (Ananya Panday) हिप सर्जरी केली आहे का, असा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
आता हिप सर्जरी केल्याने अनन्या पांडे ही सोशल मीडियावर तूफान ट्रोल होताना दिसत आहे. लोक हे अनन्या पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. अनन्या पांडे हिच्याकडून हिप सर्जरीबद्दल खुलासा करण्यात आला नाहीये. मात्र एक चर्चा आहे की, अनन्या पांडे हिने हिप सर्जरी केली आहे.
Ananya Panday | अनन्या पांडे सोशल मीडियावर ट्रोल
अनन्याने हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी रेडिटवर शेअर केला आणि त्यासोबत त्यांनी सांगितले की अनन्याने हिप सर्जरी केली आहे. एका नेटकऱ्याने सांगितले की अनन्या नेहमीच तिच्या लूकवरून त्रस्त असते.
याआधी अनन्या पांडेनं सोशल मीडियावर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची एक झलक दाखवली होती. तर त्यानंतर देखील अनन्या ट्रोल झाली होती. त्यावेळी अनन्यानं लिप्सवर फिलर केल्याचं दिसलं. अनन्यानं लिव्हिंग रूममध्ये सेल्फी क्लिक केला होता. त्यावेळी तिनं स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला होता. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर तिला तिच्या लूक्सवरून ट्रोल करण्यात आलं.
दरम्यान, अनन्या लवकरच ‘कॉल मी बे’ या ओटीटी सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती इशिता मोइत्राने केली आहे आणि कॉलिन डी कुन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वीर दास, गुरफतेही पीरजादा, विहान समत, वरुण सूद, मुस्कान जाफरी, लिसा मिश्रा, निहारिका लायरा दत्त आणि मिनी माथूर देखील दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हवेलीत पार पडली ‘अजित मॅरेथॅान’, प्रतिक्षा बाजारे यांच्याकडून आयोजन
मनोज जरांगे पाटील 7 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; असा असणार दौरा
बजाजची ‘ही’ बाईक एकदा चार्ज केल्यावर धावणार तब्बल 136 किमी; जाणून घ्या किंमत
विधानसभेपूर्वी महायुतीत खटके; ‘त्या’ जागेवरून वादाची ठिणगी?
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला सर्वात मोठा धक्का!