बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनन्या पांडे हाजिर हो!, ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या अडचणी संपता संपेना

मुंबई | कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला स्टारकीड आर्यन खान हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना अभिनेत्री अनन्या पांडे हीचं नाव समोर आल्याने खळबळ माजली होती. अनन्या पांडेच्या घरी छापेमारी झाली आणि तिची तब्बल 3 तास चौैकशी करण्यात आली.

अनन्या पांडेला आता पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता अनन्या पांडेला आज सकाळी 11 वाजता एनसीबीच्या कार्यालयात पुन्हा एकदा हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे अनन्या पांडेच्या अडचणी मात्र संपता संपत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर अनन्या पांडे ही चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबाबत त्या दोघाचं बोलणं झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हे सर्व आरोप अनन्याने चौकशीदरम्यान फेटाळून लावले आहेत. तसेच चौकशीला उशिरा हजर राहिल्याने समीर वानखेडे हे अनन्यावर भडकल्याचंही त्यावेळी सांगितलं गेलं.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एकाच शाळेतील असल्याने आर्यन खानशी आणि त्याच्या बहीणीशी मैत्री असल्याचं अनन्याने सांगितलं आहे. तसेच चॅटमध्ये झालेलं बोलणं हे सिगारेटबद्दल होतं. असं स्पष्टीकरण तिने दिलं आहे. त्यामुळे आजच्या चौकशीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More