बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नववीत असताना अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले, गोस्वामींच्या अटकेने करवाचौथला फळ मिळालं”

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली.

माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असं अक्षता नाईक म्हणाल्या आहेत.

नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, आज करवाचौथला त्याचं फळ मिळालं, अशा भावना अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या.

गाडीवर दोन बाटल्या फेकून मारल्या, तर त्रास होतो. माझ्या घरातील दोन प्रियजन गेले आहेत. नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, वयाच्या चौदाव्या वर्षी. माझा जीव तुटणार नाही का? आज करवाचौथ आहे, हे त्याचंच फळ आहे, असं अक्षता नाईक यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत?, त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?”

ऑनलाईन शिक्षणात दिवाळीची सुट्टी देणार का?; वर्षा गायकवाड म्हणाल्या…

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

पोलीस आतापर्यंत झोपले होते का?- चंद्रकांत पाटील

‘हिसाब होगा… इंटरेस्ट लगाके’; अर्णब यांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा राज्य सरकारला अप्रत्यक्ष इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More